Join us

ते रक्तचंदन आंध्रातले

By admin | Updated: December 14, 2014 01:57 IST

समुद्रातून दुबईला निघालेले कोटय़वधींचे रक्तचंदन आंध्र प्रदेशातील जंगलातून मुंबईला आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

मुंबई : समुद्रातून दुबईला निघालेले कोटय़वधींचे रक्तचंदन आंध्र प्रदेशातील जंगलातून मुंबईला आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. विशेष म्हणजे या तस्करीचा सूत्रधार माफिया महंमद अली याने याआधीही किमान सात ते आठ वेळा याच माध्यमातून कोटय़वधींचे रक्तचंदन दुबई आणि अन्य देशात पाठविल्याची माहिती समोर आल्याचे समजते.
अंमलबजावणी संचलनालय आणि तटरक्षक दलाने गेल्या आठवडय़ात भर समुद्रात अल मारवा व गंगासागर या गलबतांवर छापा घालून 2क् कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी रोखली होती. या प्रकरणी अटक खलाशांच्या चौकशीतून या तस्करीमागील मुख्य सूत्रधार अली असल्याची माहिती समोर आली. या तस्करीचा पुढील तपास करणा:या गुन्हे शाखेने अलीला गजाआड केले. त्याच्या चौकशीतून हे रक्तचंदन आंध्र प्रदेशातून मुंबईत आल्याची माहिती समोर आली. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीने हा साठा आंध्रातल्या तस्करांकडून विकत घेतला व तो दुबईत चढय़ा भावाने विकणार होता. वर्षानुवष्रे मालवाहू गलबतांमधील इंधन चोरून त्याची तस्करी करणा:या अलीने गेल्या काही महिन्यांपासून रक्तचंदनाची तस्करी सुरू केल्याचीही माहिती समोर आली. या प्रकरणी गुन्हे शाखा आंध्र प्रदेशातील तस्करांची माहिती जाणून घेण्याची धडपड करत आहेत.  गुजरातहून मका घेऊन दुबईला निघालेले अल मारवा हे गलबत मुंबईजवळ आले तेव्हा अलीने त्यावर रक्तचंदन चढवले. मुंबईत येऊन पडलेला रक्तचंदनाचा साठा अलीने गंगासागर नावाच्या जहाजातून समुद्रात धाडला होता. गंगासागर जहाज समुद्रात निघाले तेव्हा रायगडनजीकच्या समुद्रात अडकून पडलेले जहाज किना:यावर ओढून आणण्यासाठी निघालो, अशी थाप जहाज मालकाने कस्टम विभागाला मारली होती. (प्रतिनीधी)