Join us
Daily Top 2Weekly Top 5

भांडुप येथे रक्तदात्यांनी जपलं ‘रक्ताच नातं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

मुंबई : भांडुप पश्चिमेच्या गणेश नगर येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत, रॉयल महाराष्ट्र ...

मुंबई : भांडुप पश्चिमेच्या गणेश नगर येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत, रॉयल महाराष्ट्र युथ फाउंडेशन आणि राजनदादा गावडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण १४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमतच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास रॉयल महाराष्ट्र युथ फाउंडेशनचे संस्थापक संतोष दिलीप इंगळे, अध्यक्ष सुमित भीमराव वाकोडे, प्रवीण म्हस्के, देवा म्हात्रे, सुनील विश्वकर्मा, आकाश सुरडकर, रवींद्र वानखेडे, आकाश वाघमारे, आतिश बिराडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सुशीलकुमार सावळे यांनी रिलायन्स फाउंडेशनचे मास्क वाटले. रेल्वे प्रवासी भजनी मंडळ आणि जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज सनातन मंडळांचे या कार्यक्रमाला योगदान लाभले. यावेळी मोहन कांबळी, सुजय धुरत, प्रशांत कदम, संदीप मयेकर, दया सावंत, महादेव चौधरी, राजेश दानले, राहुल म्हात्रे, कोमल राहुळ, मीनल कांबळी, प्रेरणा सनस, शेखर गावडे, सुनील नारकर, प्रकाश सकपाळ, संतोष नार्वेकर, संजय तावडे, राहुल इंगळे, सुधीर मोहिते उपस्थित होते.

लोकमत, रॉयल महाराष्ट्र युथ फाउंडेशन आणि राजनदादा गावडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भांडुप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित होते.