Join us

खासगी रुग्णालयांतही होणार रक्तदान शिबिर

By admin | Updated: June 15, 2017 02:10 IST

आता खासगी रुग्णालयातही रक्तदान शिबिर घेण्याची परवानगी राष्ट्रीय रक्तदान रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांतही पुरेसा रक्तसाठा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आता खासगी रुग्णालयातही रक्तदान शिबिर घेण्याची परवानगी राष्ट्रीय रक्तदान रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांतही पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होऊन गरजूंपर्यंत पोहोचेल या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारी महिन्यात याविषयी निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करत मुंबई शहर-उपनगरातील पाच मोठ्या रुग्णालयांनी त्याला प्रतिसाद देत शिबिरांचे आयोजन करण्याची परवानगी मागितली आहे. परळमधील ग्लोबल रुग्णालय, वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, गोरेगावातील फोर्टिस रुग्णालय,पालघरमधील वेदान्त इन्स्टिट्यूट आणि नवी मुंबईतील अपोलो या रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांचा त्यात समावेश आहे. यापूर्वी केवळ सरकारी, निमसरकारी, पालिका, विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांनाच रक्तदान शिबिरांचे आयोजन करता येत होते. पण, नव्या बदलामुळे खासगी रुग्णालयांनाही आवश्यकतेनुसार शिबिरांचे आयोजन करता येईल. मात्र, यासाठी या रुग्णालयांना रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवश्यक तांत्रिक ज्ञान असलेल्या ८ ते १० कर्मचाऱ्यांची भरतीही करावी लागणार आहे, असे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद सहायक संचालक डॉ. थोरात यांनी सांगितले....तर लेखी तक्रार करावीविश्वस्त संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांना अनेकदा बाहेरून रक्तदाता आणण्यास सांगितले जाते. हे चुकीचे आहे. पण, अनेकदा याबाबत रुग्ण तक्रार करत नाहीत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून रक्तपेढ्यांना नोटीस पाठवणे किंवा परवाना रद्द करणे आदी कारवाई करता येत नाही. त्यामुळे यापुढे रुग्णालयांकडून रक्त उपलब्ध केले जात नसेल, तर रुग्णांनी वा नातेवाइकांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी. त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात येईल, असे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले.