Join us

आज भारत डायमंड बोर्समध्ये रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासह गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळावे, यासाठी लोकमतच्या वतीने १ ते १५ जुलै ...

मुंबई : राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासह गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळावे, यासाठी लोकमतच्या वतीने १ ते १५ जुलै या कालावधीत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक, संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ८ आणि ९ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वांद्रे - कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्सच्या सहकार्याने बोर्समधील ट्रेडिंग हॉल, टॉवर एच वेस्टमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल.