Join us
Daily Top 2Weekly Top 5

१०५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:06 IST

मुंबई - राज्य शासनाच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही गिरगावकर टीम, मॅजेस्टिक कट्टा आणि मुंबई पोलीस परिमंडळ-२ यांच्या वतीने ...

मुंबई - राज्य शासनाच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही गिरगावकर टीम, मॅजेस्टिक कट्टा आणि मुंबई पोलीस परिमंडळ-२ यांच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात १०५ जणांनी रक्तदान करून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला स्वयंसेवी संस्था सदस्यांनी कोरोनाविषयक नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली.

बालवैज्ञानिक स्पर्धेला प्रतिसाद

मुंबई - बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, मुलाखत आणि कृती संशोधन प्रकल्प या चार फेऱ्यात पार पडली. या वर्षी स्पर्धेसाठी राज्यातून २६ हजार विद्यार्थी, महाराष्ट्राबाहेरून दोन विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला.