मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर होताच मुंबई वाहतूक पोलिसांनी या निवडणुकीला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीचा पसारा पाहता मोठय़ा प्रमाणात वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तयार ठेवला आहे. निवडणुकीच्या काळात वाहतुकीचे नियम मोडणा:यांविरोधात कारवाईसाठी 100 पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी मोठय़ा प्रमाणात बाईक आणि चारचाकी वाहने उमेदवार आणि कार्यकत्र्याकडून वापरताना त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करणा:यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. काँग्रेसचे उत्तर मुंबईतील लोकसभेचे असलेले उमेदवार संजय निरुपम यांनी मालाड ते चांदिवली अशा आयोजित केलेल्या बाईक रॅलीत बाईकस्वारांनी नियमांना हरताळ फासला आणि अशा जवळपास 80 बाईकस्वारांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या ब:याच कारवाया वाहतूक पोलिसांकडून लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत करण्यात आल्या.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही प्रचारसभा, रॅलीदरम्यान नियम मोडणा:या कार्यकत्र्याविरोधात अशीच कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी सभा, पदयात्र, रॅली तसेच जमणा:या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ठिकाणी वाहतुकीचे कुठलेही नियोजन बिघडू नये, यासाठीही वाहतूक पोलिसांची खास नजर असेल, असे सह पोलीस (वाहतूक) आयुक्त बी. के. उपाध्याय यांनी सांगितले.
सध्या जवळपास 1,500 ते 1,700 पोलीस कार्यरत असतात. मात्र राजकीय पक्षांचे तिकीटवाटप झाल्यानंतरच रॅली आणि प्रचारसभांना सुरुवात होणार आहे. ही धामधूम सुरू होताच आमचे वाहतूक पोलीस त्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहतील. त्यावेळी साडेतीन हजार वाहतूक पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर कार्यरत असेल. या काळात मुंबई पोलिसांच्या सहकार्याने शंभरपेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. या धामधुमीत कोणीही नियम मोडल्यास त्याच्यावर वाहतुकीच्या नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
च्सभा, प्रचार रॅली ज्या ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार असेल.
च्वाहतुकीचे नियम मोडणा:या कार्यकत्र्याविरोधात जास्तीतजास्त प्रमाणात कारवाई केली जाईल.
च्निवडणूक काळात ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह विशेष मोहीमही उघडण्यात येणार आहे.
च्विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त वाहतूक पोलीस कार्यरत ठेवण्यासाठी 22 किंवा 23 सप्टेंबरपासून त्यांच्या सुटय़ा रद्द होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पाटीचे अरविंद केजरीवाल हे मुंबईत येऊन गेले होते. त्यावेळी अंधेरी स्थानकार्पयत जाण्यासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास केला होता. केजरीवाल ज्या रिक्षातून प्रवास करीत होते त्यामधून ज्यादा प्रवासी वाहतूक झाल्याने त्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}