Join us  

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 5:38 AM

कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, अंधेरी स्थानकांदरम्यान अप, डाउन जलद मार्गावरही ब्लॉक असेल.

मुंबई : कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, अंधेरी स्थानकांदरम्यान अप, डाउन जलद मार्गावरही ब्लॉक असेल.कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंडनंतर त्या पुन्हा धिम्या मार्गावर धावतील.बोरीवली-अंधेरीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी २.३५ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या काळात लोकल फेऱ्या बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून वळविण्यात येतील.विशेष फे-या : हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी४. १० वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या काळात या मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेºया चालविण्यात येतील.

टॅग्स :मुंबई लोकलबातम्या