Join us

फ्लीट फूटर्सचा धमाकेदार विजय

By admin | Updated: June 27, 2017 01:26 IST

अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात फ्लीट फूटर्स एफसी संघाने तुफान आक्रमक खेळ करताना चँलेंजर्स एफसी संघाला ७-० असे लोळवून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात फ्लीट फूटर्स एफसी संघाने तुफान आक्रमक खेळ करताना चँलेंजर्स एफसी संघाला ७-० असे लोळवून बोरीवली प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये विजयी आगेकूच केली. उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना फूटर्स संघाने चँलेंजर्स संघाची हवाच काढली.मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) मान्यतेने आणि बोरीवली स्पोटर््स फाऊंडेशनच्या वतीने सेंट फ्रान्सीस डी’अ‍ॅसीसी मैदानावर झालेल्या या सामन्यात फ्लीट फूटर्सचा एकहाती दबदबा राहिला. आक्रमक सुरुवात करताना त्यांनी प्रतिस्पर्धी चँलेंजर्स एफसीला अखेरपर्यंत दडपणाखाली आणले. चँलेंजर्स एफसीच्या कमजोर बचावफळीचा फायदा घेत फ्लीट फूटर्सने एकामागोमाग एक गोल करताना सामन्याचे चित्र स्पष्ट केले. त्याचबरोबर फूटर्सने बचावामध्येही चमक दाखवताना चँलेंजर्सच्या स्ट्रायकर्सना आपल्या गोलक्षेत्रातही फिरकू दिले नाही.तुषार पुजारी आणि ग्रेनविले मुर्झलो यानी प्रत्येकी २ गोल करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच, निहार जाधव, अग्नेलो पिकार्डो आणि विनयन सकपाळ यांनी प्रत्येकी एक गोल करुन चँलेंजर्सच्या आव्हानातली हवा काढली. मध्यंतरालाच फ्लीट फुटर्सने ३-० अशी आघाडी घेत चँलेंजर्स एफसीचा पराभव स्पष्ट केला होता.