Join us
Daily Top 2Weekly Top 5

10 वीच्या विद्याथ्र्यावर शाळेतच ब्लेडने वार

By admin | Updated: July 22, 2014 02:08 IST

फातिमा हायस्कूलमध्ये सोमवारी सकाळी आठवीतील विद्याथ्र्याने दहावीत शिकणा:या निशांत शुक्ला (16) या विद्याथ्र्यावर ब्लेडने वार करण्याची धक्कादायक घटना घडली.

मुंबई : मालाड (पूर्व) येथील दत्तमंदिर रोडवर असलेल्या फातिमा हायस्कूलमध्ये सोमवारी सकाळी आठवीतील विद्याथ्र्याने दहावीत शिकणा:या निशांत शुक्ला (16) या विद्याथ्र्यावर ब्लेडने वार करण्याची धक्कादायक घटना घडली. 
या हल्ल्यात निशांत जखमी 
झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आठवीतील विद्याथ्र्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 
मालाडचा निशांतने दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात मध्यस्थी केली होती. याच राग मनात ठेवत आरोपी मुलाने सोमवारी सकाळी 1क् वाजता मधल्या सुटीत निशांतला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व रागाच्या भरात आरोपी मुलाने कंपासमधील ब्लेडने निशांतच्या गळ्यावर वार केले. हा प्रकार शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी निशांतला रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)
 
च्निशांतच्या गळ्यावर झालेली जखम गंभीर नसली तरी  गळ्याला दुखापत झाली आहे.
च्जखमी मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिंडोशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डफळे यांनी दिली. 
च्या घटनेने या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.