Join us

रोह्यात काळ्या गुळाचा साठा

By admin | Updated: January 18, 2015 23:01 IST

कोलाड, रोहा, चणेरातील अनेक व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काळा गूळ आयात केला जातो. या काळ्या गुळाचा साठाही केला जात आहे.

रोहा : कोलाड, रोहा, चणेरातील अनेक व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काळा गूळ आयात केला जातो. या काळ्या गुळाचा साठाही केला जात आहे. हा काळा गूळ गावठी दारू बनविण्यासाठी सर्रास वापरात येत असल्याने हातभट्टीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत नागरिकांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.तालुक्यात गावठी हातभट्टीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. अनेक वाडीपाडा आणि जंगलात गावठीचे उत्पादन होते. यात कित्येक पिढया बरबाद होतात. याचे देवकान्हे दारूकांड हे उत्तम उदाहरण आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाला अनेक निवेदन देण्यात आले. रोहा, कोलाड, चणेरा शहरात गुळाची बेधडक विक्री होत आहे.