Join us

भाजपाचे प्राधान्य पाणीप्रश्नाला!

By admin | Updated: April 19, 2015 23:30 IST

पालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या भाजपाने आपला बहुउद्देशीय जाहीरनामा प्रकाशित केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्याच्या ग्रामविकासमंत्री

अंबरनाथ : पालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या भाजपाने आपला बहुउद्देशीय जाहीरनामा प्रकाशित केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते तो प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात पाण्याच्या प्रश्नासोबत महिला सुरक्षेचाही मुद्दा घेण्यात आला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील प्राचीन शिव मंदिराच्या बारकूपाडा येथील पटांगणावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंकजा मुंडे आणि दानवे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शहराचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पाणीसमस्या, रस्त्यांची कामे, महिला सुरक्षा यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. नाट्यगृह, उद्योग प्रशिक्षण केंद्र, महिला बचत गट भवन, छाया रुग्णालयाचे नूतनीकरण, प्रशासकीय भवन असे विषय या जाहीरनाम्यात आहेत. खासदार कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार आदी होते.