मुंबई - भारतीय जनता पक्ष, उत्तर मुंबईतील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित २७ नगरसेवकांनी आज सकाळी कांदिवली( पूर्व),हायवेच्या आकुर्ली मेट्रो स्टेशन समोरील भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेऊन त्यांच्या विचारांना अभिवादन केले. त्यानंतर येथील सर्व नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई महानगरपालिका) मुख्यालयाकडे मार्गस्थ झाले, अशी माहिती भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष व प्रभाग क्रमांक ४७चे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिली. तिकडून आम्ही मुंबईतील सर्व विजयी भाजप नगरसेवक भाजप गट नोंदणीसाठी कोकण भवनला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्व. अटलजींच्या राष्ट्रभक्ती, सुशासन आणि विकासाभिमुख विचारधारेने प्रेरित होऊन, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
Web Summary : Newly elected BJP corporators from North Mumbai paid tribute to Atal Bihari Vajpayee before heading to the Mumbai Municipal Corporation for registration. They pledged commitment to Mumbai's development inspired by Vajpayee's ideals.
Web Summary : उत्तर मुंबई से नवनिर्वाचित भाजपा पार्षदों ने मुंबई नगर निगम में पंजीकरण के लिए जाने से पहले अटल बिहारी वाजपेयी को श्रद्धांजलि दी। उन्होंने वाजपेयी के आदर्शों से प्रेरित होकर मुंबई के विकास के लिए प्रतिबद्धता जताई।