Join us

भाजपाच्या मिशनवर सेना नाराज

By admin | Updated: January 8, 2015 02:21 IST

१०० जागा जिंकून महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे मिशन भारतीय जनता पार्टीने निश्चित केले असून त्यावर शिवसेनेतून नाराजी व्यक्त होत आहे.

‘मिशन १००’चा वाद : महापालिका निवडणुकीचे पडघम, दोघांचीही स्वबळाची तयारीपुन्हा काडीमोडची शक्यतामुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किमान १०० जागा जिंकून महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे मिशन भारतीय जनता पार्टीने निश्चित केले असून त्यावर शिवसेनेतून नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ‘मिशन १५०’ वरून दोन्ही पक्षांची युती तुटली होती. आता भाजपाने ‘मिशन १००’ निश्चित करून काडीमोडाचे निमित्त शोधून ठेवले आहे. भाजपाने सुरु केलेल्या हालचालींमुळे शिवसेनेच्या गोटात नाराजीचे सूर प्रकट होऊ लागले आहेत.भाजपाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडे निम्म्या जागांची मागणी करण्याचे ठरवले आहे. त्याला शिवसेनेनी विरोध केल्यामुळे युती तुटली तर सुंठी वाचून खोकलाच गेला. मात्र २२७ जागांच्या या महापालिकेतील निम्म्या जागा ११४ जागा लढायला मिळाल्या तरीही भाजपा आपले ‘मिशन १००’ राबवू शकते. (विशेष प्रतिनिधी)भाजपाची रणनिती अशी...च्विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपाचे १५ आमदार विजयी झाले आहेत. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात महापालिकेचे ७ ते ८ वॉर्ड येतात. त्यापैकी किमान चार ते पाच वॉर्डात भाजपाला मताधिक्क्य असल्याने या वॉर्डातील भाजपाची ताकद टिकवून ठेवतानाच वाढवण्याकरिता प्रयत्न करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. च्यामुळे भाजपाचे ६० ते ६५ नगरसेवक सहज विजयी होतील. याखेरीज अन्य पक्षातून येऊ इच्छिणाऱ्या ३० ते ३५ आजी-माजी नगरसेवकांची यादी भाजपाने तयार केली आहे. अन्य पक्षातून असे तगडे उमेदवार आणून ‘मिशन १००’ पूर्ण करण्याचे भाजपाने ठरवले आहे. च्पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मागील आठवड्यात मुंबईत आले होते, तेव्हा त्यांच्यासमोर या ‘मिशन’चे सादरीकरण केले. हे मिशन फत्ते झाले तर भाजपाला बहुमताकरिता जेमतेम १५ जागा कमी पडतात. मिशनची अजून चर्चा नाही - शेलारमुंबई पालिकेच्या निवडणुकीत ‘मिशन १००’ राबवण्याची अजून कुठलाही चर्चा झालेली नाही. असे असताना ही चर्चा कशी सुरु झाली तेच कळत नाही, असे मत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी व्यक्त केले.भाजपा खूप घाई करीत आहे - शेवाळेभाजपा खूप घाई करीत आहे. राज्यात सध्या आम्ही एकत्र असून आम्हाला बऱ्याच निवडणुका एकत्र लढवायच्या आहेत. त्यामुळे भाजपाने सांमजस्याची भूमिका घ्यावी, असे मत शिवसेना खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले.