Join us

घाटकोपर पि›मेत भाजप प्रचारात थंड

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST

घाटकोपर पि›मेत भाजप प्रचारात थंड

घाटकोपर पि›मेत भाजप प्रचारात थंड
सेना-मनसेची प्रचारात आघाडी
मुंबई । दि. ०४(प्रतिनिधी)
............................................
घाटकोपर पि›म मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रचाराला अजूनही सुरुवात न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येथे भाजपने आमदार राम कदम यांना उमेदवारी दिली. काही दिवसांपूर्वीच कदम यांनी मनसेतून भाजपमध्ये उडी मारली होती. कदम यांच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला की काय, अशी चर्चा आता मतदारांमध्येही सुरू झाली आहे.
युती-आघाडी तुटल्यानंतर पाच प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. त्यात शिवसेनेकडून विभागप्रमुख सुधीर मोरे, मनसेकडून विभागाध्यक्ष दिलीप लांडे यांना तर भाजपतर्फे कदम यांच्या नावाचा सहभाग होता. यापैकी शिवसेनेचे मोरे आणि मनसेचे लांडे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. ठरलेल्या रणनीतीनुसार दोन्ही उमेदवार घरोघरी पोहोचले आहेत. या मतदारसंघात कोणत्या अडचणी आहेत, आमदार म्हणून कदम यांनी काय करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय केले, हे जनतेला पटवून देत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघात कदम यांनी आमदार म्हणून येथील जनतेसाठी एकही आश्वासक काम केलेले नाही. याउलट देवदर्शन, रक्षाबंधन असे दिखाऊ कार्यक्रम राबवले, त्याची जोरदार प्रसिद्धी केली आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
या परिस्थितीत मराठी मतदार बहुसंख्य असलेल्या या मतदारसंघात सेना, मनसेने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे जाहीर सभा उद्या येथे होत आहे. सेनेनेही पदयात्रा, चौकसभांवर भर दिला आहे. मात्र लोकवर्गणीतून उमेदवारी अर्ज भरण्याचा दिखावा करणारे कदम प्रचार फिरताना दिसत नसल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. (प्रतिनिधी)