Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या पाठीत भाजपाने खंजीर खुपसला

By admin | Updated: October 7, 2014 00:35 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे बोट पकडून ज्यांना पुढे नेले, महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण करून दिली. अशा भाजपवाल् यांनी युती तोडून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे

पालघर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे बोट पकडून ज्यांना पुढे नेले, महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण करून दिली. अशा भाजपवाल् यांनी युती तोडून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलाआहे. अशा कृतघ्न पक्षाला या निवडणुकीत गाडून टाका असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाध्यक्ष अदित्य ठाकरे यांनी पालघरमध्ये केले. पालघर जिल्ह्यातील युवा सेनेशी संवाद साधण्यासाठी आज सेनेचे युवासेनाध्यक्ष अदित्य ठाकरे,आशिष बांदेकर पालघरमध्ये आले होते. भगिनीसमाज शाळेच्या उद्यानामध्ये आयोजित या सभेला उद्देशून भाषणात अदित्य इाकरे यांनी भाजपा व काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षावर हल्ला चढविला. भाजपवाले तेलंगणा आंध्रपासून तोडत आहेत. आता ते निवडून आले तर महाराष्ट्रापासून विदर्भ तोडतील व बेळगाव कर्नाटकला देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून रोखा असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात नवनवीन उद्योगधंदे येत नाही. बेरोजगारांची संख्या वाढतेय. सेनेची सत्ता आल्यास शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांचा पाठीवरील दप्ताराचे ओझे कमी करून सर्व अभ्यासक्रम मोबाईलवर कसा साठवून ठेवला येईल अशा दृष्टीने शिक्षणपद्धतीत बदल करण्याचा आमचा मानस असल्याचे ठाकरे यांनी शेवटी सांगितले. यावेळी बोईसर विधानसभेचे उमेदवार दळवी यांनी बहुजन विकास आघाडीवर टीका करीत हा पक्ष जमीन खरेदीदारांचा सातबारा पक्ष उरल्याची टीका केली. तर माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या १४१ विकासकामाचे उद्घाटन राजेंद्र गावितांनी केल्याचे सांगून निवडून आल्यास जिंदाल बंदराला विरोधसह ग्रामीण रुग्णालय, समस्या, पाणी, वीज इ. प्रश्नांना हात घालणार असल्याचे सांगितले.