Join us

भाजपाला हवी पालिकेची तिजोरी

By admin | Updated: December 9, 2014 01:08 IST

राज्यातही युतीचे सरकार आल्याने महापालिकेत महत्त्वाच्या समिती अध्यक्षपदांसाठी आस लावून बसलेल्या भाजपा नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला आह़े

शेफाली परब/पंडित ल्ल मुंबई
तळ्यात-मळ्यात करीत विधानसभेच्या निवडणुकीत फाटलेली युती अखेर शिवण्यात आली़ मात्र राज्यातही युतीचे सरकार आल्याने महापालिकेत महत्त्वाच्या समिती अध्यक्षपदांसाठी आस लावून बसलेल्या भाजपा नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला आह़े तरीही केंद्र आणि राज्यात भाजपाच वरचढ असल्याने शिवसेनेवर दबाव टाकून पालिकेच्या तिजोरीवरच दावा टाकण्याची कुजबुज भाजपा नगरसेवकांमध्ये रंगू लागली आह़े
21 वर्षे महापालिकेत सत्तेवर एकत्र असूनही शिवसेनेने भाजपाला महत्त्वाच्या पदांपासून दूरच ठेवल़े गेल्या काही वर्षात संख्याबळ वाढू लागल्यानंतर भाजपाने दबावतंत्र सुरू केले होत़े त्यामुळे सुधार व शिक्षण या वैधानिक समित्या तर  विशेष समित्यांचे अध्यक्षपद देऊन भाजपाला झुलविण्यास शिवसेनेने सुरुवात केली़ याबाबत राग असूनही युतीमुळे भाजपाचे नगरसेवक मूग गिळून गप्प राहत होत़े मात्र विधानसभेत तिकीट वाटपावरून युती तुटल्याने भाजपाच्या इच्छुक नगरसेवकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या़ होत्या़
म्हणूनच निवडणुकांनंतर युतीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्यानंतरही भाजपाने महापालिकेत असहकार पुकारला़ प्रस्तावांना विरोध करून विरोधी पक्षांबरोबर सभात्याग करण्यात भाजपा नगरसेवक आघाडीवर होत़े तसेच एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या वैधानिक, विशेष व प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला पाणी पाजण्याचे मनसुबेही भाजपा नेत्यांनी जाहीर केले होत़े मात्र युतीचे सूर जुळले आणि पालिकेतले हे गणित बिघडल़े त्यामुळे नाराज नगरसेवकांनी आता दबक्या आवाजात स्थायी समितीवर दावा टाकण्यास सुरुवात केली आह़े (प्रतिनिधी) 
 
यासाठी हवी स्थायी समिती
च्भाजपा सत्तेत असले तरी शिवसेनेने आर्थिक नाडय़ा आपल्या हातात ठेवल्या आहेत़ स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेने स्वत:कडेच कायम ठेवल्यामुळे भाजपा सत्तेत असूनही निर्णय प्रक्रियेत दुबळीच राहिली़ 
च्पालिका निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आणि ती वाढत-वाढत आता केंद्र व राज्यात भाजपाचेच सरकार असल्याने पालिकेतही आर्थिक केंद्र आपल्याच हाती असावे, असे मत भाजपातील काही नगरसेवक व्यक्त करीत आहेत़ मात्र याबाबत भाजपातून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही़
 
भाजपाचे 31 नगरसेवक असून शिवसेनेचे 75 नगरसेवक आहेत़ काही समित्यांमध्ये विरोधी पक्ष आणि युतीचे संख्याबळ काठावर असल्याने प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत चुरस लागत़े अशा वेळी भाजपा शिवसेनेला अडचणीत आणू शकत होती़