Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून मुंबईत मेळावे; आशिष शेलारांची मविआवर टीका

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 10, 2024 20:54 IST

उत्तर पश्चिम लोकसभेत मविआचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव निश्चित आहे असं शेलारांनी म्हटलं.

मुंबई - मुंबईत महायुतीचे प्रत्येक विधानसभेत संयुक्त मेळावे  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. आज मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील वर्सोवा आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. दोन्ही मेळाव्याला प्रतिसाद चांगला दिसून आला.

पश्चिम उपनगरात युतीच्या सरकारच्या काळात मेट्रोसह अन्य विकास कामांचा उहापोह करीत शेलार यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. उत्तर पश्चिम लोकसभेत मविआचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव निश्चित आहे. महायुतीच्या प्रचंड विजयासाठी एकजुटीने कामाला लागण्याची सूचना त्यांनी मेळाव्यात उपस्थितांना केल्या.

 यावेळी वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर,अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम, गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर आणि महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.