Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेश माध्यम विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:06 IST

मुंबई : प्रसिद्धी प्रमुखांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे ...

मुंबई : प्रसिद्धी प्रमुखांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी केले. भाजप प्रदेश माध्यम विभागातर्फे आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पक्षाच्या विभागीय व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांसाठी ही कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे काल व आज सलग दोन दिवस आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय माध्यम विभागप्रमुख व खासदार अनिल बलुनी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

---------