Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेनेचा घरोबा तुटला

By admin | Updated: March 13, 2015 22:59 IST

पालघर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपाने हाती घेतलेला सेनेचा झेंडा उतरवला. शुक्रवारी झालेल्या जि. प. च्या विविध विषय समितीच्या

पालघर : पालघर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपाने हाती घेतलेला सेनेचा झेंडा उतरवला. शुक्रवारी झालेल्या जि. प. च्या विविध विषय समितीच्या निवडणुकीत बविआला सोबत घेऊन महिला बालकल्याण, समाजकल्याण व कृषी अशा तीन सभापतीपदाची पदे भाजपने मिळविलीत तर बविआला त्या बदल्यात महत्वाचे असे बांधकाम समितीचे सभापतीपद दिले. भाजपाने दगाफटका केल्याची भावना सेनेच्या गोटात निर्माण झाली असून भाजपाने बविआशी समेट केल्याने सेना आपल्याला मिळालेले उपाध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.१८ फेब्रुवारीला अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर जि. प. च्या विषय समितीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच भाजप यापुढील काळात सेनेची साथ करणार की बविआशी याबाबत अनेक तर्क वितर्क सुरू राहिल्याने या निवडणुकीकडे राजकीयदृष्ट्या अनेकांचे डोळे लागले होते. बिनशर्त पाठींबा देणाऱ्या बविआला सत्तेत वाटा हवा होता हे ही या निमित्ताने स्पष्ट झाले. सेनेला मात्र भाजपा-सेना युतीत बविआची भागीदारी नको होती. जि. प. च्या चार विषय समित्यांपैकी भाजपा-सेनेने दोन दोन जागा वाटून घ्याव्यात, असा सेनेचा प्रस्ताव होता. वरीष्ठ पातळीवरून यासाठी चर्चा चालू राहिली. मात्र भाजपाने सेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेत बविआशी आघाडी करून नवीन समीकरण बनविले व तीन समित्या पदरात पाडून घेतल्या. या निवडणुकीत महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी विनीता कोरे, समाजकल्याा समितीच्या सभापतीपदी भाजपाचे धर्मा गोवारी व कृषी सभापतीपदी भाजपाचे अशोक वडे यांची निवड झाली तर बांधकाम समिती सभापतीपदी बविआचे सुरेश तरे यांची निवड झाली.या निवडणुकीत भाजपा-बविआ आघाडी विरूद्ध सेना अशी सरळ लढत झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पाच व राष्ट्रवादीचे तीन मिळून आठ सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला मात्र यावेळीही राष्ट्रवादीतून निवडून आलेले ज्येष्ठ नेते दामोदर पाटील यांनी बविआला पाठींबा दिला. काँग्रेसच्या एकमेव सदस्या तटस्थ राहिल्या. (वार्ताहर)