मुंबई : पुढची महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाने त्या दिशेने रणनीतीही आखण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार शिवसेनेची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांमध्ये भाजपाने शिरकाव सुरू करून मित्रपक्षांवरच कुरघोडी सुरू केली आहे़ सत्तेवर असतानाही भाजपाने शिक्षकांसाठी स्वतंत्र संघटना सुरू केली आहे़मुंबई शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघ नावाने शिक्षकांसाठी भाजपाने संघटना स्थापन केली आहे़ या संघटनेचे प्रमुख भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार आणि पालिकेतील भाजपा गटनेते मनोज कोटक आहेत़ अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची तीन ते चार लाख रुपयांची थकबाकी एकरकमी मिळवून देण्यात आल्याचे श्रेय भाजपाने आपल्या खिशात घालून शिवसेनेला दणका दिला आह़े (प्रतिनिधी)
भाजपाची सेनेवर कुरघोडी
By admin | Updated: February 3, 2015 00:18 IST