मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, कोल्हापुरातील आ. सुरेश हळवणकर ही नावे भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत.शेलार यांचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांशी चांगले संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून सहकार्य करू शकणारा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. शेलार मराठा समाजाचे आहेत आणि रावसाहेब दानवे यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी मराठाच चेहरा दिला जाईल, अशी चर्चा आहे. आक्रमक नेता अशी ओळख असलेल्या शेलार यांचे मित्रपक्ष शिवसेनेशी संबंध तणावाचे राहिले आहेत. त्यांनी शुक्रवारी दिल्लीत अमित शहा आणि अन्य काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.
भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार, हळवणकर चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 02:21 IST