Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला घरचा आहेर, टोलबंदीसाठी गोपाळ शेट्टी रस्त्यावर

By admin | Updated: September 11, 2015 21:25 IST

टोलनाका बंद करण्यासाठी दहीसर टोलनाक्यानर भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि तेथील स्थानिक आमदार यांनी भाजपा कार्यकर्त्या सोबत अंदोलन केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - टोल बंद करण्यासाठी दहीसर टोलनाक्यानर भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि तेथील स्थानिक आमदार यांनी भाजपा कार्यकर्त्या सोबत अंदोलन केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोलनाक्यावरील या आंदोलनामुळे बोरीवलीपासून मीरा रोडपर्यंत आणि कांदिवलीकडून बोरवलीकडे जाणाऱ्या वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. 

भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी  यांच्या आंदोलनामुळे सरकारला घरचा अहेर मिळाला असेच म्हणावे लागेल. 
काम करुण घरी जाणाऱ्या नागरीकांना याचा त्रास होत आहे. आंदोलनामुळे वाहणांच्या लांबचलाब रांगा झाल्या आहेत  रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहणाच्या लाबंच लांब रांगा उभ्या आहेत. 
आंदोलनाच्या ठिकाणी पोलिस पोहचले असून आंदोलन करणाऱ्या गोपाळ शेट्टीसह अन्य कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतले आहे.