Join us  

भाजपा शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:13 AM

रेशनधान्य, आरोग्यसुविधा,आव्हाड प्रकरणासंदर्भात निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेशन दुकानातून मिळणाऱ्या धन्यासंदर्भात शासन पातळीवर योग्य उपाययोजना होत नसल्याबाबत, आरोग्य सुविधांकडे लक्ष दिले जात नसल्याने आरोग्यसेवा देणार्ऱ्यांमध्येच कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव आणि जितेंद्र आव्हाड प्रकरणात एक निवेदन बुधवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून दिले. तबलिकमधील संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि ज्यापद्धतीने गृहमंत्री अनिल देशमुख विधान करीत आहेत, ते पाहता लक्ष हटविण्यासाठी राजकारण केले जाऊ नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खा. गोपाल शेट्टी, खा. मनोज कोटक, योगेश सागर यावेळी उपस्थित होते. प्रामुख्याने आरोग्यसुविधेसंबंधीच्या मागण्या यावेळी राज्यपालांपुढे मांडण्यात आल्या. आरोग्य कर्मचाºयांना प्रमाणित किटस उपलब्ध करून देण्यात याव्यात. राज्य सरकार त्याची खरेदी करू शकते, त्यांनी ती खरेदी करावी. आरोग्य कर्मचारी आणि पोलिस हे खर्ºया अथार्ने समोर येऊन ही लढाई लढत असताना त्यांच्या पगारात कुठलीही कपात करण्यात येऊ नये. आरोग्यसेवा भक्कम राहिली तरच महाराष्ट्र सुरक्षित राहील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.शिवसेनेचीही राज्यपालांबाबत तक्रारशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना राज्यपाल कोशारी यांना लक्ष्य केले. राज्यपाल हे अधिकाºयांची स्वतंत्र बैठक घेतात आणि आदेशही देतात.त्यांनी थेट अधिकाºयांना आदेश देऊ नयेत. त्यांची जी काही भावना असेल ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावी, राज्यपालांनी असे परस्पर अधिकाºयांना आदेश देणे चुकीचे आहे, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :भाजपा