Join us

शिवरायांच्या खांद्यावर भाजपा नगरसेविकेचा हात

By admin | Updated: May 4, 2016 12:22 IST

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या असलेला राजश्री शिरवडकर यांच्या एका फोटोमुळे नवा वाद निर्माण झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 04 - भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्या एका फोटोमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या असलेला त्यांचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 
 
अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवून उभ्या राहिल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोबतच लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रचार करणा-या भाजपा पक्षावरही यानिमित्ताने सोशल मिडियावरुन टीका करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत 'छत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी के साथ' असा नाराच भाजपाने दिला होता. 
 
भाजपा नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सायन येथे बालमेळाव्याचे आयोजन केल होते. पाचशेहून अधिक मुलं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धा आणि विविध कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले होते.