Join us  

महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणे भाजपा नगरसेवकाला भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:50 AM

विनापरवाना होर्डिंग्ज लावणे आणि त्यावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाºयाला मारणे भाजपाचे अंधेरीमधील नगरसेवक मुरजी पटेल यांना भोवले आहे.

मुंबई : विनापरवाना होर्डिंग्ज लावणे आणि त्यावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाºयाला मारणे भाजपाचे अंधेरीमधील नगरसेवक मुरजी पटेल यांना भोवले आहे. या बेकायदा कृत्याबद्दल उच्च न्यायालयाने पटेल यांना दोन महिन्यांच्या आत २४ लाख रुपयांची नुकसानभरपाई महापालिकेकडे जमा करण्याचा आदेश नुकताच दिला. बेकायदा होर्डिंग्जच्या प्रकरणात पालिकेच्या इतिहासात अशा प्रकारचा आदेश प्रथमच देण्यात आला आहे.जानेवारी २०१८ मध्ये मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाउंडेशन या संस्थेच्या बेकायदा होर्डिंग्जवर महापालिका कर्मचारी कारवाई करत होते. त्या वेळी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. पालिकेने त्याबद्दल पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने पटेल व इतरांच्या विरोधात न्यायालय अवमानाची कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान पटेल यांनी बिनशर्त माफी मागितली. तसेच नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली. त्यांना २४ लाखांची नुकसानभरपाई पालिकेकडे जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.‘दोन महिन्यांत अहवाल सादर करा’न्या. अभय ओक व न्या. एम.एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने पटेल यांनी दोन महिन्यांत २४ लाख रुपयांची भरपाई पालिकेला द्यावी आणि पालिकेने ही रक्कम मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाºयांसाठी व सार्वजनिक कामांसाठी वापरावी, असे आदेश दिले. पटेल यांनी नगरसेवक या नात्याने प्रत्येक आठवड्यात एकदा आपल्या वॉर्डमध्ये फिरून बेकायदा होर्डिंग्ज व बॅनरची पाहणी करून त्याविषयी पालिकेकडे तक्रारी द्याव्यात आणि याबाबतचा कृती अहवाल दोन महिन्यांनंतर सादर करावा, असे आदेशही खंडपीठाने दिले.

टॅग्स :न्यायालय