Join us

भाजपानेही स्वीकारले इच्छुकांचे फॉर्म

By admin | Updated: September 8, 2015 01:37 IST

केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये भाजपानेही ^‘एकला चलो रे’ या दृष्टिकोनातून इच्छुकांचे फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिवसभर येथील सावित्रीबाई फुले

डोंबिवली : केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये भाजपानेही ^‘एकला चलो रे’ या दृष्टिकोनातून इच्छुकांचे फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिवसभर येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात फॉर्म घेण्यात आले. आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, पूर्व शहर भाजपाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह उपमहापौर राहुल दामले आदी उपस्थित होते.डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागातील अर्ज घेतल्याचे सांगण्यात आले. जिल्हा संघटनमंत्र्यांनी ते घेतले असून, ११ सप्टेंबर रोजी कल्याणमध्येही अत्रे रंगमंदिरात तेथील इच्छुकांचे फॉर्म घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सोमवारी मलंगपट्ट्यातील इच्छुकांना कल्याणमध्ये येऊन अर्ज देण्याचे आवाहन केले आहे.