चांदिवलीत भाजप अनुपस्थित, शिवसेनेचे पारडे जड
By admin | Updated: October 4, 2014 22:56 IST
सुपरवोट.....
चांदिवलीत भाजप अनुपस्थित, शिवसेनेचे पारडे जड
सुपरवोट...........................................................................चांदिवलीत भाजप अनुपस्थित, शिवसेनेचे पारडे जड मुंबई: गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढून शिवसेनेने चांदिवली विधानसभा मतदार संघातून प्रथमच हिंदी भाषिक उमेदवाराला संधी देत नवा पायंडा पाडला आहे. चांदिवली मतदार संघात शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी हे चार उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान आमदार नसीम खान यांना नाराजीची झळ बसण्याची मोठी शक्यता आहे. त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सीताराम तिवारी यांचा अर्ज बाद झाल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. सध्या शिवसेनेचे संतोष सिंह, काँग्रेसचे नसीम खान, मनसेचे ईश्वर तायडे आणि राष्ट्रवादीतून शरद पवार हे चार उमेदवार रिंगणात आहेत. या विधानसभा मतदार संघात सुमारे सव्वा लाख मुस्लिम वोट बँक तर उत्तर भारतीयांची ऐंशी हजार मते आहेत. या विभागातून प्रथमच हिंदी भाषिक उमेदवार शिवसेनेने दिला आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. तर गेल्या तीन पंचवार्षिक कालावधीत नसीम खान यांनी मतदार संघात काहीही ठोस कामे केलेली नाहीत. विरोधक तर त्यांना नारळमंत्री म्हणून संबोधत आहेत. या मतदार संघावर गेल्या १५ वर्षांपासून नसीम खान यांचे वर्चस्व होते. परंतु विकास कामाच्या नावाने येथे नेहमीच बोंब असल्याने जनता आता नव्या चेहर्याच्या शोधात आहे. (प्रतिनिधी)