Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचा वाढदिवस साजरा

By admin | Updated: January 5, 2016 02:56 IST

श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचा वाढदिवस सायन येथील सोमय्या मैदानावर ‘साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३००’ कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी साजरा करण्यात आला.

मुंबई : श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचा वाढदिवस सायन येथील सोमय्या मैदानावर ‘साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३००’ कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी साजरा करण्यात आला. या वेळी राजकीय क्षेत्रातील दिग्गजांपैकी भारतीय जनता पार्टीचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, भाजपाचे आमदार राज पुरोहित आणि जिग्नेश हिरानी, कौशिक शहा आदी मान्यवर उपस्थित होते.गोपाळ शेट्टी यावेळी म्हणाले की, ‘श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या रूपाने आधुनिक युगात दिव्य ज्ञानाचा महासागर मुंबईत अवतरला आहे. त्याचा मुंबईकरांना नक्कीच फायदा होईल. अशा प्रकाराच्या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे मानवाचे कल्याण होणार आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांनीही अशा प्रकाराचे सामाजिक कार्य केले पाहिजे.’ आशिष शेलार म्हणाले की, ‘हा कार्यक्रम मुंंबईत होणे ही गौरवाची बाब आहे. श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या विचारांचा समाजाला फायदाच होणार आहे.’ राज पुरोहित म्हणाले की, ‘मागील चाळीस वर्षांत अशा प्रकाराचा कार्यक्रम येथे झालेला नाही. रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या मौल्यवान विचारांचा खजिना मुंबईकरांसाठी या निमित्ताने खुला झाला आहे. दरम्यान, १ जानेवारीपासून सुरू झालेला हा कार्यक्रम १० जानेवारीपर्यंत रंगणार आहे. (प्रतिनिधी)