- मनोहर कुंभेजकरमुंबई : पर्यावरणाच्या रक्षणात व मत्स्यबीज निर्मितीत तिवरांच्या झाडांचे खूप महत्व आहे.ओरिसात काही वर्षांपूर्वी मोठे वादळ आले तेंव्हा येथील तिवरांच्या झाडांनी ढाल म्हणून ओरिसाचे रक्षण केल्याने मोठी हानी झाली नव्हती.मुंबईला देखिल तिवरांच्या झाडांचे कवच आहे.मात्र तिवरांच्या झाडांची कत्तल करून व खाजण जमीन बुजवून अनधिकृत बांधकामे व झोपड्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याने मुंबईतील तिवरांचा पट्टा कमी होत असल्याने चिंतेची बाब आहे.मुंबईत वसोर्वा,लोखंडवाला परिसरात तिवरांची झाडे मोठ्या प्रमाणात आहे.मात्र पूर्वी या झाडांना संरक्षण नसल्याने भूमाफिया या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून येथे अनधिकृत बांधकामे व झोपड्या उभ्या राहत असत.यावर उपाय म्हणून वसोर्वा विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी २०१४ साली येथून आमदार म्हणून निवडून आल्यावर येथील तिवरांची झाडे कश्या प्रकारे वाचवता येतील यावर विचारमंथन सुरू केले.येथील तिवरांच्या झाडांच्या संरक्षणासाठी बायोफेनसिंग म्हणजे जैविक कुंपण,ज्याला व्हर्टिकल गार्डन अथवा लिव्हिंग वॉल म्हटले जाते अशी योजना यशस्वीपणे राबवण्याचे आपण ठरवल्याचे डॉ.लव्हेकर यांनी सांगितले. येथील तिवरांच्या झाडांच्या संरक्षणासाठी बायोफेनसिंग व चेनफेनसिंगची योजना त्यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडली. याकामाला त्यांनी मंजुरी देऊन डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करून दिला.राज्य शासनाच्या सर्व अधिका?्यांनी मोलाचे सहकार्य केल्याने वसोर्वा बँक रोड येथे बायोफेनसिंग व सात ठिकाणी चेनफेनसिंगची योजना आपण प्रत्यक्षात राबवली जात असून याच्या अंमलबजावणीचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली.ही पहिलीच अभिनव यौजना असून येथील तिवरांच्या झाडांना मोठे संरक्षण कवच मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.वर्सोव्याचे क्विन्स आॅफ ग्रीन नेकलेस ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वसोर्वा बँक रोडला १८० मीटर बायोफेनसिंग कार्यान्वित झाले असून येथील ७ ठिकाणी सुमारे ३९३२.४८ चेनफेनसिंगचे काम लवकर पूर्णत्वास जाणार असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.वायू व ध्वनिप्रदूषण होणार कमीबायोफेनसिंगचे व चेनफेनसिंगचे काय फायदे आहेत असे विचसरले असता, डॉ.लव्हेकर म्हणाल्या की, यामुळे तिवरांच्या झाडांना मानवी अतिक्रमणापासून बचाच होतो, तसेच त्यांना वायू व ध्वनी प्रदूषणापासून वाचवण्यास मदत होते. तसेच बायोफेनसिंगच्या मधील तिवरांच्या झाडांमुळे परिसारतील आॅक्सिजनच्या प्रमाणत वाढ होत असून प्रदूषण नियंत्रणात मोठी मदत होते. तसेच शहरीकरणाच्या अमर्याद वेगामुळे फोफावलेल्या काँक्रीटच्या जंगलात हरितक्रांती घडवण्याची मुंबईतील ही पहिली योजना निश्चित एक बेंचमार्क ठरेल असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
वर्सोव्यातील तिवरांच्या झाडांना बायोफेनसिंगचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 06:35 IST