Join us

ब्रिमस्टोव्ॉडचा सल्ला पालिकेला दुप्पट महाग

By admin | Updated: November 23, 2014 01:05 IST

पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईची क्षमता वाढविणारा ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पच नव्हेतर त्याचा सल्लाही पालिकेला महाग पडू लागला आह़े

मुंबई : पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईची क्षमता वाढविणारा ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पच नव्हेतर त्याचा सल्लाही पालिकेला महाग पडू लागला आह़े दिरंगाईमुळे या प्रकल्पाच्या खर्चाने हजारो कोटींचा आकडा पार केला आह़े तर आता 19 कोटींमध्ये सल्ला देण्यास तयार सल्लागाराने 44 कोटी रुपये वाढवून मागितले आहेत़ यास तीव्र विरोध दर्शवून स्थायी समितीने हा प्रस्ताव फेटाळून लावला आह़े
26 जुलै 2क्क्5 रोजी मुंबईत आलेल्या पुरानंतर पालिकेने ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्प हाती घेतला़ या प्रकल्पांतर्गत मुंबईतील पजर्न्य जलवाहिन्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता ताशी 5क् मि़मी़ वाढविणो, नदी-नाल्यांचे रुंदीकरण आदी कामे सुरू आहेत़ याचा खर्च साडेतीन हजार कोटींच्या घरात पोहोचला आह़े केंद्राकडून आर्थिक साहाय्य व प्रकल्पावर सल्ला देण्यासाठी एका कंपनीला नियुक्त करण्यात आल़े या सल्लागाराला 19 कोटी रुपये देण्यात येणार होत़े मात्र आता या खर्चात वाढ करून तब्बल 63 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने आणला़ हा वाढीव खर्च नाकारण्याची सूचना सदस्यांनी केली़ मात्र असे केल्यास करारपत्रनुसार केंद्र व राज्यातून येणारा निधी मिळणार नाही, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली़ मात्र हा प्रस्ताव एकमताने दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला़ (प्रतिनिधी)
 
मुंबईतील पजर्न्य जलवाहिन्यांचे सव्रेक्षण करून संकल्पचित्रे तयार करणो, आराखडा बनविणो, अंदाजपत्रक व निविदा तयार करणो, वाहिन्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरणासाठी सल्ला तसेच जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान (जेएनएनआरयूएम) अंतर्गत केंद्रातून निधी मिळण्यासाठी अहवाल सादर करणो़
 
पुनर्निविदेची तयारी : संबंधित कंपनीकडेच याचे सॉफ्टवेअर असल्याने एव्हिएशन विभागाने गुप्तता पाळण्यास सांगितले होत़े म्हणून जुन्याच सल्लागाराला काम देण्यात येत होत़े मात्र यावर सदस्यांचा आक्षेप असल्यास 15 दिवसांमध्ये पुनर्निविदा मागविण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आऱ श्रीनिवास यांनी सांगितल़े