Join us  

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा लवकरच कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 6:41 AM

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईतील धारावी झोपडपट्टी ओळखली जाते.

- अजय परचुरे मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईतील धारावी झोपडपट्टी ओळखली जाते. या झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पाला या आधीच राज्य सरकारने विशेष प्रकल्पाचा दर्जा देत, तिचा आंतरराष्टÑीय स्तरावर पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता मात्र तो प्रत्यक्षात साकारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून, त्यानुसार येत्या नोव्हेंबरमध्ये जागतिक स्तरावर निविदा मागविण्याच्या कामाला सुरुवात होईल.साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदा निघतील. निविदेचे काम पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनीवासन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुनर्विकासासाठीचा ८० टक्के निधी हा निविदा मिळालेल्या कंपनीचे बिल्डर देतील, तर २० टक्के निधी राज्य सरकार देईल, असेही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.या आधी पाच टप्प्यांत धारावीचा पुनर्विकास करण्यात येत होता. यातील पाचव्या टप्प्याचा विकास हा म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येत होता. म्हाडाने या प्रकल्पांतर्गत सेक्टर पाचमध्ये एक टॉवर बांधून, त्यात जवळपास ३५० धारावीवासीयांचे पुनर्वसनही केले. मात्र, एकंदरच प्रकल्पाचे काम रखडत सुरू असल्यामुळे आता म्हाडाकडून पाचव्या टप्प्यातील काम काढून घेण्यात येणार असून, संपूर्ण धारावीचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येईल, अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली.>मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणारधारावी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांची पात्रतानिश्चिती अथवा इतर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या आधी विशेष अधिकार नसलेले मुख्य कार्यकारी अधिकारी पद आता अधिक बळकट करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्पात जो निर्णय घेतील, तो अंतिम असेल.>पुनर्विकासासाठीअसा केला जाणार खर्च