Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतात डब्ल्यू.डब्ल्यू.ई.ची मोठी क्रेझ

By admin | Updated: September 19, 2014 23:08 IST

भारतभेटीवर मी पहिल्यांदाच आलो असून येथे खास पारंपरिक पध्दतीने स्वागत पाहून मी खूप भारावून गेलो.

मुंबई: भारतभेटीवर मी पहिल्यांदाच आलो असून येथे खास पारंपरिक पध्दतीने स्वागत पाहून मी खूप भारावून गेलो. शिवाय अनेकांनी मला बघत्याच क्षणी ओळखल्याने भारतात डब्ल्यू.डब्ल्यू.ई. किती लोकप्रिय आहे याची जाणीव झाली, असे भारतभेटीवर आलेल्या डब्ल्यू.डब्ल्यू.ई. स्टार खेळाडू ‘बॅड न्यूज बॅरेट्ट’ (वेड बॅरेट्ट) याने ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.
नुकत्याच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर ‘लोकमत’ सोबत संवाद साधताना बॅरेट्टने आपल्या भारतभेटी दरम्यान आलेले अनुभव सांगितले. बेंगळुरु विमानतळावर आल्यानंतर काहीवेळातच चाहत्यांनी आणि खास करुन लहान मुलांनी गर्दी केली. तेव्हाच भारतातील फॅन्सची कल्पना आली. बॅरेट्टच्या तीन दिवसीय मुंबई भेटीच्या कार्यक्रमासाठी लोकमत माध्यम प्रायोजक होते.
गुरुवारी बॅरेट्टने परळ येथे स्पेशल ऑलिम्पिकमधील गतिमंद मुलांसोबत फुटबॉल खेळून त्यांना आनंदाचे क्षण दिले. याविषयी विचारले असता बॅरेट्ट म्हणाला की, हा माङया आयुष्यातील न विसरता येणारा क्षण आहे. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माङयासाठी अनमोल आहे. 
सध्या दुखापतीमुळे खेळापासून दूर असलेला बॅरेट्टने फुटबॉलपटू, बॉक्सर आणि अभिनेता अशी देखील छाप पाडली आहे. तरी डब्ल्यू.डब्ल्यू.ई.कडे कसा वळाला यावर बॅरेट्टने सांगितले की, मी लहानपणापासूनच या खेळाचा खूप मोठा चाहता असल्याचे त्याने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
 
भारताच्या ‘खली’ विरुध्दची लढाई सर्वासाठीच खूप आव्हानात्मक असते. मी त्याच्याविरुध्द अनेकवेळा लढलो असून नशिबाने दोनवेळा जिंकलो देखील आहे. मात्र अनेकवेळा ‘खली’ वरचढ ठरला आहे. रिंग बाहेर मात्र आम्ही चांगले मित्र असून ‘खली’ एक चांगल्या स्वभावाचा आहे. तरी रिंगमध्ये मात्र आक्रमक स्वभावाने तो सर्वानाच चीत करतो.
- वेड बॅरेट्ट