Join us

गोरेगावात भाजपला मोठा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:35 IST

गोरेगावात भाजपला मोठा धक्कासमीर देसाई यांनी हातात बांधले शिवबंधनमनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ...

गोरेगावात भाजपला मोठा धक्का

समीर देसाई यांनी हातात बांधले शिवबंधन

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीत हातात शिवबंधन बांधून गोरेगाव येथील माजी नगरसेवक व भाजपचे मुंबई सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

६ वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिट्ठी देत त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. मात्र गेले काही दिवस ते भाजपवर नाराज होते.२०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले होते. त्यांच्या पत्नी राजुल देसाई या भाजपच्या प्रभाग क्रमांक ५६ च्या विद्यमान नगरसेविका असून त्यांनी पी दक्षिण वॉर्डचे प्रभाग समिती अध्यक्षपददेखील भूषवले होते. समीर देसाई यांच्या प्रवेशाने गोरेगावात शिवसेनेला मजबूती येईल, अशी चर्चा आहे.

कोण आहे समीर देसाई

समीर देसाई हे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा त्यांनी महापालिकेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. गोरेगावमधून त्यांनी काँग्रेसचे नगरसेवकपद भूषवले होते. मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपद त्यांनी भूषवले होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ते दहा वर्षे सदस्य देखील होते.

---------------------------------------