Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बींचा नवा लूक

By admin | Updated: June 3, 2014 23:27 IST

नुकतेच एका वेगळ्या लूकमध्ये केलेल्या अॅडमुळे अमिताभ बच्चन चर्चेत होते.

नुकतेच एका वेगळ्या लूकमध्ये केलेल्या अॅडमुळे अमिताभ बच्चन चर्चेत होते. आता पुन्हा एकदा ते आर. बाल्की यांच्या शमिताभ या चित्रपटातील अतिशय विचित्र लूकमुळे चर्चेत आहे. या लूकमुळे बिग बी त्यांच्या रिअल लूकपेक्षा मोठे दिसत आहेत. चित्रपटातील बिग बी यांचा लूक रहस्यमय आहे. त्यांनी पांढ:या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. पांढरे केस आणि पांढ:या दाढीत बिग बी खूपच वेगळे दिसत आहेत. त्यांची पोनी टेलही चर्चेत आहे. यापूर्वी बाल्की यांच्या चित्रपटातच बिग बी एका वेगळ्या लूकमध्ये दिसले होते. चित्रपटात त्यांच्यासोबत धनुष आणि कमल हसन यांची मुलगी अक्षराही दिसणार आहे.