Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बिग बीं"नी हजारोंच्या गर्दीत एका "स्पेशल"ला केलं अभिवादन

By admin | Updated: May 17, 2017 17:53 IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर दर रविवारी हजारो चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी जमा होतात.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर दर रविवारी हजारो चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. घराबाहेर येऊन बिग बी देखील चाहत्यांचं अभिवादन स्वीकारतात. या रविवारही असंच काही झालं पण यावेळी बिग बी एका स्पेशल फॅनचं अभिवादन करताना दिसले. हा स्पेशल फॅन म्हणजे दुसरं कोणी नसून त्यांची मुलगी श्वेता नंदा आहे.
 
अमिताभ बच्चन यांनी आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे . यामध्ये स्मित हास्यासह हात उंचावून ते आपली मुलगी श्वेताकडे पाहाताना दिसत आहेत. तर श्वेता त्यांचा फोटो क्लिक करताना दिसतेय. तर समोर असलेले हजारो चाहतेही त्यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अमिताभ आणि श्वेता यांचा हा फोटो  खूपच नॅचरल दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोलाही चांगली पसंती मिळत आहे. 
 
दर रविवारी अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची एक झलक पाहायला जलसा या त्यांच्या घराबाहेर गर्दी करतात. अमिताभ बच्चन आमिर खानसह आगामी चित्रपट  "ठग्स ऑफ हिन्दुस्तान" मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.