Join us

मोठ्या जाहिरात फलकांना अभय

By admin | Updated: January 9, 2015 22:39 IST

रस्त्यांना खेटून असणाऱ्या जाहिरात फलकांबाबत तक्रार करुनही अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही.

आविष्कार देसाई ल्ल अलिबागरस्त्यांना खेटून असणाऱ्या जाहिरात फलकांबाबत तक्रार करुनही अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. लहान फलक लावणाऱ्यांना नोटिसा पाठवून मोठमोठाले जाहिरात फलक लावणाऱ्यांना अभय दिल्याने बांधकाम विभागाच्या दुटप्पी धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अलिबागमधील रस्त्यांच्याकडेला लावण्यात आलेले फलक अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे हे फलक काढून संबंधितांवर कारवाई करावी, अशा तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तत्कालीन रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा आमदार सुभाष पाटील यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी डी.जी. विडेकर यांनी अलिबाग-रोहे मार्गावरील पोल्ट्री फार्म, सागर तरंग, कैवल्य फार्म, अनिशा रिसॉर्ट, अलिबाग हॉलीडे होम, हॉटेल सागररत्न, डीएसएम रिअलयर्स, प्रकृती रिसॉर्टसह अन्य फलक लावणाऱ्यांविरोधात नोटीस पाठविल्या आहेत. अलिबाग - वडखळ - मांडवा मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या जाहिरात फलक लावणाऱ्यांना बांधकाम विभागाने अभय दिले आहे. अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांना लवकरच नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे विडेकर यांनी सांगितले.