Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिरसाड येथे वाहतूक नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन

By admin | Updated: February 15, 2015 23:20 IST

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड या मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते पार पडले.

पारोळ : मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड या मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी वाहतूक अधीक्षक समाधान पवार व वाहतूक निरीक्षक सावंत हे हजर होते. या नियंत्रण कक्षामुळे मुंबई-अहमदाबाद व नाशिक मुंबई या महामार्गावर वाहूक पोलिसांचे नियंत्रण राहणार आहे. शिरसाड या ठिकाणी वाहतूक पोलीस चौकी होती. पण या ठिकाणी उड्डाणपूलाचे काम हाती घेतल्याने व त्या चौकीचा वाहतुकीसाठी अडथळा येत असल्याने ती तोडण्यात आली. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाच्या कामकाजासाठी कक्ष नसल्यामुळे या मार्गावर वाहतूक नियंत्रण कक्ष पोलीसांसाठी कठीण होत असल्याने वाहतूक विभागाने दुमजली नियंत्रण कक्ष उभारण्याचे शिरसाड येथे निश्चित करून कक्षाचे भूमीपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आला. (वार्ताहर)