Join us

भुरट्या चोराला पोलीस कोठडी

By admin | Updated: December 7, 2014 22:24 IST

किल्ले रायगडावर एका कार्यक्रमासाठी आलेल्या महिला पर्यटकांच्या भाड्याच्या रुममध्ये घुसून त्यांचा कॅमेरा व रोख रक्कम अशी एकूण ८८ हजार २७० रुपयांची चोरी

बिरवाडी : किल्ले रायगडावर एका कार्यक्रमासाठी आलेल्या महिला पर्यटकांच्या भाड्याच्या रुममध्ये घुसून त्यांचा कॅमेरा व रोख रक्कम अशी एकूण ८८ हजार २७० रुपयांची चोरी करणाऱ्या भुरट्या चोरास महाड तालुका पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहाथ पकडून त्याला महाड येथील न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने आरोपीला ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.मुलुंड पूर्व येथील मिताली नायर (४३) या आपली मैत्रीण ज्योती राणे यांच्यासह किल्ले रायगडावर आल्या होत्या. येथील एमटीडीसीची रुम त्यांनी भाड्याने घेतली. शुक्रवारी रात्री बंद रुमच्या दारावाटे चोरट्याने रुममधील कॅनान कंपनीचा कॅमेरा व एका काळ्या बॅगेमध्ये ठेवलेली रक्कम लांबवली. या प्रकरणी पोलिसांनी भुरटा चोर नामदेव अवकिरकर (२८, रा. हिरकणीवाडी ) याला ताब्यात घेतले असता त्याने चोरी कबूल करून चोरीचा मालही दिला. (वार्ताहर)