काल्हेर : ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या धोबी तलाव परिसरातील मोहंमद हनीफ ऊर्फ जुगनू शौकतअली अन्सारी याला भिवंडीत अटक केली. त्याला भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी १५ सप्टेंबर २०१४ रोजी २ वर्षांकरिता ठाणे जिल्हा क्षेत्रातून तडीपार केले होते. तरी तो भिवंडी परिसरातील एसटी स्टॅण्डमधील कल्याणकडे जाणाऱ्या बसच्या प्लॅटफॉर्मजवळ फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्याला जेरबंद केले. (प्रतिनिधी)
भिवंडीत तडीपार गुंडास अटक
By admin | Updated: January 28, 2015 23:03 IST