Join us
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ११ अर्ज

By admin | Updated: September 26, 2014 23:53 IST

भिवंडीतील तीन विधानसभा मतदारसंघांत ११ उमेदवारी अर्ज दाखल केले.

भिवंडी : भिवंडीतील तीन विधानसभा मतदारसंघांत ११ उमेदवारी अर्ज दाखल केले. भिवंडी पूर्वमध्ये अन्सारी अल्लाउद्दीन मुसाफिर (बहुजन समाज पार्टी) अब्दुल सलाम जमालुद्दीन (अपक्ष) व तेजस रामदास पाटील (बहुजन विकास आघाडी) या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारांची संख्या ५ झाली आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये महादेव आंबो घाटाळ (राकाँपा), मोरे तुकाराम सुरेश (बहुजन समाज पार्टी), पाटील शांताराम दुंदाराम (भाजपा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारांची संख्या ६ झाली आहे. तसेच भिवंडी पश्चिममध्ये नवीद हसन मोमीन (अपक्ष), जाधव रोहिणी उत्तम (बहुजन समाज पार्टी), कमलेश बालय्या नागुल (अपक्ष), भगत ज्ञानेश्वर पांडुरंग (अपक्ष), खान शोएब अश्फाक (काँग्रेस) यांनी आपले अर्ज भरले आहेत.