मुंबई : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘पंडित भीमसेन जोशी’ पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 3 डिसेंबरला नाशिक येथे होणा:या सोहळ्य़ात करण्यात येणार आहे.
संगीत क्षेत्रतील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर हा पुरस्कार सुरू केला. संगीत क्षेत्रत भरीव कार्य करणा:या कलाकारांना
दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे
स्वरूप आहे. नाशिक येथे होणा:या भारतरत्न
पंडित भीमसेन शास्त्रीय संगीत महोत्सवात यंदाचा हा पुरस्कार प्रभा अत्रे यांना प्रदान केला जाणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार किशोरी आमोणकर आणि पंडित जसराज यांना देण्यात आला
आहे.
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे किराणा घराण्याच्या गायिका आहेत. पंडित सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या त्या शिष्या आहेत. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून त्यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा आदी उपशास्त्रीय संगीत तसेच गझल, नाटय़संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे.
1955 पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. तसेच, त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘स्वरमयी’ या मराठीतील पहिल्या पुरस्काराला राज्य शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)
प्रभाताईंनी संगीत शारदा, संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीतिकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. 1955 पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम करीत आहेत.