Join us
Daily Top 2Weekly Top 5

भिका:यांची झाडाझडती

By admin | Updated: July 6, 2014 00:04 IST

पोलिसांनी रस्त्यावर भीक मागणारी मुले व त्यांच्या पालकांची झाडाझडती सुरू केली आहे.

 

सूर्यकांत वाघमारे - नवी मुंबई
पोलिसांनी रस्त्यावर भीक मागणारी मुले व त्यांच्या पालकांची झाडाझडती सुरू केली आहे. भीक मागण्यासाठी पळवून आणलेल्या मुलांचा वापर केला जात आहे का याची पडताळणी सुरू केली  आहे. यासाठी भीक मागणारांची कसून चौकशी केली जात आहे. 
नवी मुंबईमधील सर्व प्रमुख चौकांमध्ये भिका:यांचे प्रमाण वाढू लागले आहे. भीक मागण्यासाठी मोठय़ाप्रमाणात लहान मुलांचा वापर होवू लागला आहे. कळकट  चेहरा असलेली मुले सिगAलवर वाहने थांबली की कारच्या काचा वाजवून पैसे मागत आहेत. अचानक एवढय़ा मोठय़ाप्रमाणात भिकारी येतात कोठून, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. भीक मागण्यासाठी पळवून आणलेल्या मुलांचा वापर केला जात असावा. या मुलांसोबत असणारे खरोखर त्यांचे पालक आहेत की या मुलांचे शोषण करत आहेत याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. भीक मागण्यासाठी मुलांचे शोषण होत आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांनी भिका:यांची धरपकड सुरू केली आहे. त्यांच्यावर कारवाई करून कसून चौकशी केली जात आहे. मुलांनाही विश्वासात घेवून माहिती विचारली जात आहे. आतार्पयत वाशी व इतर ठिकाणीही भिका:यांवर कारवाई करण्यात आली आहे. 
  पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी भिका:यांकडील मुले तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. शनिवारी सीबीडी पोलिसांनी परिसरात ही विशेष मोहीम राबवली. त्यामध्ये सीबीडी परिसरात भिका:यांकडे असलेल्या मुलांची खातरजमा करून घेण्यात आली. या मुलांचे खरे पालक ते भिकारीच आहेत ? का ही मुले चोरीची आहेत ? ही बाब यावेळी तपासण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कार्येकर यांनी सांगितले. त्यानुसार तपासलेल्या भिका:यांपैकी एकाकडेही चोरीचे अथवा हरवलेले मूल आढळले नसल्याचे देखील कार्येकर यांनी सांगितले.
 
4नवी मुंबईत सध्या वाशी सिग्नल, वाशी रेल्वे स्थानक, सीबीडी, कोपर खैरणो, ऐरोली परिसरात लहान मुले भीक मागताना मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. त्यामध्ये राज्यातून अथवा राज्याबाहेरील इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या मुलांचा समावेश असू शकतो. त्यानुसार भिका:यांकडील मुलांची ओळखपरेड करण्याचा पोलिसांचा प्रय} चालू आहे.
 
4नवी मुंबई परिसरातून सध्या लहान मुले हरवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यापैकी चोरीला गेलेली मुले भिका:यांकडून भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांच्या उपक्रमातून काही हरवलेली मुले सापडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.