Join us  

भीम ज्योतीचे काम लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 2:56 AM

भीम ज्योतीचे काम मार्गी लावल्याबद्दल दादर, नायगांव येथील आदर्श विपश्यना केंद्र, कुशल स्रेह मंडळ यांनी आमदार कोळंबकर यांचे आभार मानले़

मुंबई : चैत्यभूमी येथे कायमस्वरूपी तेवत राहणारी भीम ज्योत उभारण्यास मंगळवारी राज्य शासनाने मंजुरी दिली़ येत्या काही दिवसांत याचे काम सुरू होणार आहे़ आॅगस्ट महिन्यात ही ज्योत कार्यन्वित करण्याचा सरकारचा मानस आहे़

यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली़ सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार कालिदास कोळंबकर, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार विजेते शशिकांत बर्वे, चैत्यभूमी समन्वय समितीचे प्रमुख नागसेन कांबळे व इतर मान्यवर या बैठकीला उपस्थित होते़ भीम ज्योतीचे काम लवकरात लवकर सुरू होईल व आॅगस्ट महिन्यात ज्योत कार्यन्वित होईल, अशी कामाची आखणी बैठकीत करण्यात आली़ भीम ज्योतीचे काम मार्गी लावल्याबद्दल दादर, नायगांव येथील आदर्श विपश्यना केंद्र, कुशल स्रेह मंडळ यांनी आमदार कोळंबकर यांचे आभार मानले़

टॅग्स :मुंबईदादर स्थानक