भार्इंदर : विनापरवानगी घर दुरुस्ती करणाऱ्याकडे अडीच लाखांची लाच मागणाऱ्या राष्ट्रवादी नगसेविका सॅन्ड्रा रॉड्रीक्स हिला ठाणे अॅण्टी करप्शनच्या पथकाने ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना मंगळवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास घरातून रंगेहाथ पकडल्याचे विभागाचे उपअधिक्षक बागलकोटे यांनी सांगितले.त्या प्रभाग समिती क्र. १ च्या सभापती असुून त्या राष्ट्रवादीचे माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नातेवाईक आहेत. प्रभागांतर्गत असलेल्या जय बजरंग नगरमध्ये राहणारे ललित शाह यांनी आपल्या जुन्या घराची विनापरवानगी दुरुस्ती करण्यास सुरुवात केली होती. त्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी घरावरील कारवाई टाळण्यासाठी शाह यांच्याकडे अडीच लाखांची लाच मागितली होती. हा प्रकार एक आठवड्यापासून सुरु होता. अखेर रक्कम देण्याचे मान्य करुन शाह यांनी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता मंगळवारी देणार असल्याचे त्यांना कळविले होते. तत्पूर्वी त्यांनी प्रकाराविरोधात ठाणे अॅण्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती. रक्कम देण्यासाठी सॅन्ड्रा यांनी आपल्या भार्इंदर पश्चिमेकडील राहत्या घरी त्यांना दुपारी ३ ते ४ वा. च्या दरम्यान बोलविले होते. त्यानुसार अॅण्टी करप्शनच्या विभागाचे उपअधिक्षक बागलकोटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे उपअधिक्षकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भार्इंदरच्या नगरसेविके ला रंगेहाथ पकडले
By admin | Updated: September 8, 2015 23:24 IST