मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, या मागणीसाठी अण्णाभाऊंच्या कुटुंबीयांनी बुधवारी आझाद मैदानात साखळी उपोषण केले. लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.अण्णाभाऊंची सून सावित्रीबाई साठे म्हणाल्या की, अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. याशिवाय शासनाने २०११ साली लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशी मान्य केल्या होत्या. मात्र त्यांची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. तरी तत्काळ आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. घाटकोपर चिरागनगरमधील अण्णाभाऊंच्या राहत्या घरात सध्या काही लोक राहत आहेत. त्यामुळे तत्काळ घराचा ताबा कुटुंबीयांना देऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाची घोषणा करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या.
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:18 IST