Join us  

Bharat Band : मुलुंड पोलीस झिंदाबाद... मुंबई बंददरम्यान मुलुंड येथील पेट्रोल पंपावर पोलिसांचे मानले रांगेत खोळंबल्या नागरिकांनी आभार   

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 9:20 PM

पेट्रोलसाठी रांगेत लागलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पेट्रोल पंप सुरु केल्याने मुलुंड पोलीस जिंदाबादचे नारे लगावत पोलिसांचे आभार मानले.

मुंबई - इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षाने पुकारलेल्या भारत बंद यशस्वी करण्यासाठी आंदोलकांनी मुलुंड येथील एलबीएस रोडवरील पेट्रोल पंप टार्गेट केले होते. आंदोलकांनी घोषणाबाजी करत पेट्रोल पंप बंद पाडले. त्यामुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची रांगच रांग लागली होती. त्यानंतर याची दाखल घेत पेट्रोल पंप बंद पाडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घटनास्थळी पोचून ताब्यात घेतलं.  त्यामुळे पेट्रोलसाठी रांगेत लागलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पेट्रोल पंप सुरु केल्याने मुलुंड पोलीस जिंदाबादचे नारे लगावत पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :भारत बंदमुंबई