Join us

भांडुपमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

By admin | Updated: September 28, 2014 22:30 IST

भांडुपमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

भांडुपमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
मुंबई: भांडुपमध्ये हत्येच्या गुन्ह्यात फरार आरोपीस अटक करण्यास भांडूप पोलिसांना यश आले आहे. फारुख इसूब शेख उर्फ गुड्डू(२८) असे आरोपीचे नाव असून तो भांडुप श्रीराम पाडा येथील राहणारा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नजरा चुकून गुड्डू पसार झाला होता. त्यात निवडणुकीच्या काळात भांडुप टेंभीपाडा परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आज सापळा रचून गड्डूला अटक केली. गड्डूकडे अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली.