Join us

भाजयुमोचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:08 IST

मुंबई-सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना परिसरातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे दि.२२ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित ...

मुंबई-सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना परिसरातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे दि.२२ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. दळणवळणासाठी व जवळपासच्या शहराशी जोडणारे रस्ते पुराच्या आणि डोंगरावरून येणाऱ्या दरड आणि मातीमुळे पूर्ण विस्कळीत झाले आहेत.

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष हर्ष पटेल आणि भाजयुमो उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष आणि शिवाय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सचिन भिलारे यांच्या पुढाकाराने झांजवड, गोरीशी, रुळे, दुधगाव येथील बाधित ग्रामस्थांना एक हात मदतीचा म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

बाधित ग्रामस्थांच्या व्यथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून योग्य तो मार्ग काढायचे आश्वासन समस्त भाजप टीमच्या वतीने देण्यात आले.

या वेळी शिवाय चॅरिटेबल ट्रस्टच्या रुपाली कुलकर्णी, प्रथमेश चोडणकार,जयेश येवगे, दीपक शाह, कल्पेश मोंडे व भाजप पदाधिकारी रजनीकांत सोनी, सुजाता रिंगे, वैभव पवार, दिलीप राजभर, विजय वाघेला,आकाश रिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.