Join us

भाईंदरला मंगळवारी कमी दाबाने पाणी

By admin | Updated: September 22, 2014 00:47 IST

शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीकडून करण्यात येणारा ८६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवारी बंद

भार्इंदर : शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीकडून करण्यात येणारा ८६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवारी बंद करण्यात येणार आहे. हा पाणीपुरवठा मंगळवारी स. ९ वा.पासून ते बुधवारी स. ९ वा.पर्यंत २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. स्टेम कंपनीमार्फत खंडित पाणीपुरवठ्यादरम्यान एमआयडीसीद्वारे (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने शहराला अपुरे पाणी कमी दाबाने मिळणार आहे. शहरवासीयांनी या दरम्यानच्या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)