Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये ज्वेलर्सला सात लाखांना लुटले

By admin | Updated: December 13, 2014 22:26 IST

पश्चिमेकडे असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानातून अज्ञात चोरटय़ांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 7 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शनिवारी घडली.

भाईंदर : पश्चिमेकडे असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानातून अज्ञात चोरटय़ांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 7 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शनिवारी घडली.
येथील स्टेशन रोडवर गजराज मेहता यांच्या मालकीचे श्री विक्रम गोल्ड नामक ज्वेलर्सचे दुकान आहे. ते बंद असताना बाहेर लावलेली संरक्षक लोखंडी जाळी तुटल्याचे शेजारच्या दुकानदाराच्या लक्षात आले. त्याने त्याची माहिती मेहता यांना दिली. मेहता यांनी दुकानात प्रवेश केला असता दागिन्यांसह रोख रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या चोरीची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून 7 लाख 15 हजार 5क्क् रु. चा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  मुख्य बाब म्हणजे ज्वेलर्स दुकानफोडीच्या अनेक घटना परिसरात घडत असल्याने पोलिसांनी दुकानात व बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह सुरक्षारक्षक तैनात करण्याच्या सुचना दिल्या असतानाही या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक तैनात नसल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)